Breaking News

मानवसेवा केअर सेंटरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

नाशिक/प्रतिनिधी। 22 -  मानवसेवा केअर सेंटरमध्ये (वृध्दाश्रम) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. प्रथम खा. गोडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले. 
नागसेन एंटरप्रायजेसचे संचालक व कॉन्ट्रॅक्टर खुशाल लोखंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तर प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष टी.एल.नवसागर यांनी राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी रवि सावंत उपस्थिती लाभली. खा. गोडसे यांचे स्वागत नवसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. खुशाल लोखंडे यांचे स्वागत मानवसेवा केअर सेंटरच्या संचालिका सौ. ललिता नवसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. सिव्हील इंडिनिअर भैय्यासाहेब 
लोखंडे यांचे स्वागत करण्यात आले. सतिश तिर्थे यांचे स्वागत बालाजी सावंत यांनी केले. सोनपसारे, अंकुश खरात यांचे स्वागत दत्ताराव खरात यांनी केले. लोखंडे परिवारातर्फे एकदिवसीय भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामराव सोनवणे, एकनाथ लोखंडे, मनोज शिंपी, मनोज महाले, अश्‍विनी निकम, समिंद्राबाई म्हस्के, शेख भाभी, दिनेश सावंत आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. लोंढे मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन मानवसेवा सेंटरच्या संचालिका सौ. ललिता नवसागर यांनी केले. कार्यक्रमाची 
सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यांनी गायक श्री. मोरे यांनी केली.