Breaking News

चांडक-बिटको महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

नाशिकरोड/प्रतिनिधी। 22 -  छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण भारताचे आराध्यदैवत असून वघ्या 50 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी केलेली प्रत्येक कामगिरी, नीती वाखाणण्याजोगी व दैदिप्यमान अशीच होती. किल्ल्यांचे व्यवस्थापन, नियोजन व रयतेच्या कल्याणाची दूरदृष्टी कौतुकास्पद व प्रेरणादायी होती असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी केले.
गेखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील चांडक बिटको महाविद्यालयात शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 9.30 वा. ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. उपप्राचार्य डॉ. डी.जी.बेलगावकर यांनीही आपल्या मनोगतात आरमारासंबंधी असलेल्या शिवरायांच्या योजना तसेच श्रीमंत योगी, जाणता राजा विषयी माहिती सांगितली. याप्रसंगी विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. एस.जी.देवधर, प्रा. एन.यु.पाटील, प्रा. जयंती भाभे, प्रा. सुदेश घोडेराव, प्रा. डी.एम.पठाण, प्रा. विजय सुकटे, प्रा. शशिकांत खेमनर, प्रा. लक्ष्मण शेंडगे, प्रा. सुधाकर बोरसे, ग्रंथपाल आर.बी.बागुल, विद्यार्थी कुणाल रूपवते, सागर सोनवणे, स्वप्नील कोहोक, सचिन पाठारे, दत्ता मोढवे, प्रा. संजय परमसागर तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरूण ताजनपुरे, रमेश काळे, दिगंबर शेजवळ आदि उपस्थित होते.