Breaking News

मनमाड शहरासह परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

मनमाड/प्रतिनिधी। 22 -   शहर व परिसरात शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था व संघटनांच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
मनमाड एसटी बस आगार
मनमाड बसस्थानक व आगारात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आगार व्यवस्थापक किरण भोसले, कार्यालयीन अधीक्षक किरण धनवटे, प्रशांत गुंड, फिरोज शेख हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी यशस्वी जाधव व जयेश जाधव यांनी शिवचरित्रावर सादर केलेल्या व्याख्यानाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. यावेळी आर. डी. आरोटे, बी. आर. मार्कँड, खैरनार, के. के. सोनवणे, ए. एच. सांगळे, एन. आर, मोरे यांच्यासह अधिकारी, चालक व वाहक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. आर. खताळ यांनी केले.
मरेमा विद्यालय, मनमाड
येथील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापक सुनंदा पैठणकर यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवकार्याची माहिती दिली. हर्षद गद्रे सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पर्यवेक्षक येवले सर, कुझरकर मॅडम उपस्थित होते.