Breaking News

माथाडी कामगार व व्हिडिओकॉन कंपनी यांच्यात मजुरी करार

 अहमदनगर । प्रतिनिधी । 21 -  अहमदनगर जिल्हा हमाल पंचायत व व्हीडिओकॉन ग्रुप ऑफ कंपनी यांच्यामध्ये भरघोस मजुरी दरवाढ करार करण्यात आला. या मजुरी दरवाढीबाबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष शंकरराव घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, माथडी असंरक्षित कामगार मंडळाचे निरिक्षक एस.जी.देवकर, व्हीडिओकॉनचे रिजवान कमाल, एच.व्ही.तरटे, जी.के.गिरगस, अनिल इवळे, चैतन्य कांडके, आर.वाय. शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी श्री.घुले म्हणाले की, मजुरी दर नव्याने सर्वानुमते निश्‍चित करण्यात आलेले असून, सदरचे मजुरी दर मजुरी व लोकल वाराईसह निश्‍चित करण्यात आलेले आहे. यावर मंडळाने निश्‍चित केलेली लेव्ही व्यवस्थापनाने नियमितपणे मंडळाकडे हिशोबाप्रमाणे जमा करावयाची आहे. सदरचे मजुरीचे दर 31/10/2018 पयरत लागू राहणार आहेत आदिंचा करार करण्यात आला असल्याचे सांगून हमाल पंचायत नेहमीच हमाल व व्यवस्थापन यांच्यातील महत्वाचा दुवा असून, हमालांना त्यांच्या मजुरीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्नशिल असते. कोणताही करार हा समाजस्यांने होणे आवश्यक असते; त्यामुळे हमाल व व्यवस्थापन यांचा फायदाच होत असतो.