मारहाणीसह विनयभंगप्रकरणी कण्हेरच्या पाच जणांविरुध्द गुन्हा
सातारा, 07 - युवतीच्या घरात घुसून तिला मारहाण आणि विनयभंग केल्याची फिर्याद सातारा तालुक्यातील कण्हेर येथील पाच जणांविरुध्द दाखल करण्यात आली आहे. जुन्या भांडणातून ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
रोहित ऊर्फ बाळू वाघमळे, विजय वाघमळे, विशाल वाघमळे, चंद्रकांत वाघमळे आणि शारदा वाघमळे (सर्व रा. कण्हेर) यांच्याविरुध्द बावीस वर्षांच्या युवतीने तक्रार दिली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून हे सर्वजण दुपारच्या वेळी घरी आले आणि आपल्याला मारहाण केली, असे तिने म्हटले असून, या पाच जणांपैकी एकाने विनयभंग केल्याचे युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.