Breaking News

शासकीय चित्रकला परीक्षेत फिरोदियाचे 25 विद्यार्थी चमकले

 अहमदनगर/प्रतिनिधी । 22 - अ.ए.सो. चे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलने शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परिक्षेची सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. अ श्रेणीत 25 विद्यार्थी तर ब श्रेणीत 107 शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. चित्रकला परिक्षेत यश संपादन करणार्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यध्यापक उल्हास दुगड, उपमुख्यध्यापिका सौ.सुषमा चिटमिल, पर्यवेक्षक विलास औटी, सुनिल ख्रिस्ती, राजेंद्र बेंद्रे उपस्थित होते.
शाळेचा इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल 99 टक्के लागला असून, यामध्ये अ श्रेणीत 14 विद्यार्थी तर ब श्रेणीत 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेत अ श्रेणीमध्ये आम्रपाली आंधळे, वृषाली बाफना, ऋतुजा बंगाळ, मृणाल बारगजे, भक्ती बर्वे, सेजल देशमुख, ज्ञानेश्‍वर फुलसाैंदर, स्नेहा जाधव, शिवाणी नगरे, श्रध्दा नाणेकर, अंकिता पडोळे, पुजा पवार, श्‍वेता सातपुते, सायली सावन या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. एलिमेंटरी चित्रकला परिक्षेत शाळेचा 98 टक्के निकाल लागला असून, अ श्रेणीत 11 विद्यार्थी तर ब श्रेणीत 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परिक्षेत अ श्रेणीत सुरज बारस्कर, प्रतिक्षा बोरुडे, मिताली फिरोदिया, आकाश गाडेकर, समृध्दी गांधी, श्रेया गांधी, स्नेहल गुंजाळ, तनया कांबळे, अंजली खिलारी, अनुराग पानसरे, अथर्व परदेशी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. 
शासकिय चित्रकला परिक्षेत यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांना कला शिक्षक प्रमोद रामदीन, राजकुमार बनसोडे, सचिन घोडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्या कला शिक्षकांचे नियामक मंडळाचे चेअरमन अशोक मुथा, खजिनदार शरद रच्चा इतर पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.