Breaking News

नवीन पिढ्यांवर सर्वधर्म समभावाचे संस्कार होणे गरजेचे

 अहमदनगर/प्रतिनिधी । 22 - समाजातील कट्टरवाद कमी होण्यास व नवीन पिढ्यांवर सर्वधर्मसमभावाचे संस्कार होण्यासाठी महान पुरुषांच्या जयंती - पुण्यतिथी सामाजिक उपक्रमाद्वारे राबवून त्यांच्या विचारांचा प्रसार करणे अपेक्षित आहे. आजच्या या सामाजिक उपक्रमांसारखे कार्यक्रम झाल्यास  पोलीसांवरील ताण कमी होईल, असे प्रतिपादन अहमदनगरचे अप्पर पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी केले. 
मखदुम सोसायटी, मराठा सेवा संघ, राजुभाई मित्र मंडळ व अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळ यांनी आयोजित केलेल्या शिवचरित्र चित्रकला जगप्रसिद्ध छायाचित्रकार ठाकुरदास परदेशी यांचे किल्लाचे छायाचित्र प्रदर्शन व प्रख्यात नाणी संग्राहक सचीन डागा यांचे दुर्मिळ नाण्यांचा खजीन्यांचे प्रदर्शन शिवजयंतीनिमित्त आदर्श शाळा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या  उद्घाटनप्रसंगी पंकज देशमुख बोलत होते. 
अध्यक्षस्थानी इतिहास तज्ज्ञ डॉ.निरज साळुंखे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, महानगर सचिव कुंडलिकराव मचे व डॉ.निरज सांळुखे, इंजि.अनिस शेख उपस्थित होते. 
डॉ.निरज साळुंखे म्हणाले कि, इतिहास प्रेमी मंडळ व मखदुम सोसायटी यांचे उपक्रम सर्वात्तम असतात नागरिकांच्या ज्ञानात भर घालण्याबरोबर समाजात आनंदी वातावरण राहण्यास मदत करतात. इतिहासाचा वापर सकरात्मक पद्धतीने कसा करावा याचा परिपाठ आपल्याला यातुन मिळतो. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठासेवा संघाचे महानगराध्यक्ष इंजि.अभिजित वाघ यांनी केले. या कार्यक्रमाचे मखदुम सोसायटीच्या वतीने सय्यद अफझल यांनी व इतिहासप्रेमी मंडळाचे वतीने कॉ.भैरवनाथ वाकळे यांनी आपले मत मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पोपटराव काळे यांनी तर आभार अबीदखान दुलेखान यांनी केले. 
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी असीफ दुलेखान, राजुभाई शेख, शेख फिरोज चाँद, दत्ता वडवणीकर, विकास कांबळे, सातपुते सर, रोहित वाळके, नोमान खान, मुजमिल खान आदी विशेष परिश्रम घेतले.