Breaking News

प्रसारभारती मंडळावर काजोलची वर्णी

नवी दिल्ली : दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ (एआयआर)चे प्रसारण करणार्‍या प्रसार भारती मंडळावर अभिनेत्री काजोलची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काजोलची प्रसार भारतीच्या मंडळावर शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली असून, ती नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्धवेळ सदस्य राहणार आहे. प्रसार भारतीची 24 फेब्रुवारीला बैठक होणार असून, या बैठकीला काजोल उपस्थित राहील, अशी आशा प्रसार भारती मंडळातील वरिष्ठ
अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.