लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरजः आ.बोंद्रे
बुलडाणा (प्रतिनिधी)। 21 - चिखली मतदार संघात जलाशयातील गाळ काढणे आणी नदीचे पुनर्जिवन करण्याचा हा लोकसहभागाचा उपक्रम मोठया प्रमाणात यशस्वी करून अमरावती विभागात आदर्श ठरावा, त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी कामाला लागावे आणी गावोगावच्या कार्यकर्त्यांनीही त्यात सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. पाण्याचे स्त्रोत बळकटी करणासाठी लोकसहभागाची गरज आहे. मतदार संघातील जलाशय आणी नदीच्या पुनर्जिवन करण्यासाठी त्यात साचलेला गाळ काढण्याच्या कामाला योग्य दिशा देण्यासाठी व गती येण्यासाठी आमदार राहुल बोंद्रे यांनी संबंधीत सर्व विभागाचे अधिकारी व अभियंता यांची आढावा बैठक घेतली. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे बरेच लघु पाटबंधारे प्रकल्प, छोटे तलाव व सिमेंट नाला बांध कोरडे पडले आहेत. वर्षानूवर्ष त्यामध्ये साचलेला गाळ काढून तो पिकाउ जमीनीत टाकणे, जमीनीची कस सुधारणे आणी अधिक उत्पादनाच्या दृष्टीने शेतकर्यांनी तो गाळ वाहून न्यावा व त्यातूनच नदींचे पुनर्जिवन होवून जलाशयातील पाण्याचा साठा सुध्दा वाढावा. या उद्ेशाने एक लोक चळवळ उभी करत असतांनाच संबंधीत अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांनी सुध्दा त्यात सक्रीय सहभाग घेवून पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्व विभागांच्या प्रमुखांची एकत्रित बेैठक घेवून त्यांच्या कामात समन्वयक साधण्यासाठी तालुका स्तरावर व मंडळ स्तरावर समिती गठीत करण्याचे आमदार राहुल बोंदे्र यांनी सुचविले.
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आयोजित या आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, बुलडाणा तहसिलदार दिपक बाजड, चिखली तहसिलदार विजय लोखंडे, चिखली गटविकास अधिकारी रामावत, राजपुत, बुलडाणा गटविकास अधिकारी लोखंडे, कार्यकारी अभियंता स्थानिक स्तर बुलडाणा देशमुख, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बुलडाणा हुमने, कार्यकारी अभियंता अभियंता ल.पा.वि.क्र.2 चिखली जेउलीकर, बाविस्कर, हराळे, तालुका कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, सुतगिणीचे उपाध्यक्ष आर.बी.वानखेडे सर, नंदुभाउ सवडतकर, राम डहाके, समाधान सुपेकर, पुरूषोत्तम शेळके, दिपक जाधव, नामदेव सदार यांची उपस्थिती होती.
सदर आढावा बैठकी दरम्यान गाळ काढतांना येणार्या अडचणी व त्यावर उपाय योजना करून परीसरातील जास्तीत जास्त गाळ कसा काढल्या जाईल या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले. लोकसहभागातून गाळ काढल्या जातो मात्र अनेक ठिकाणी धारणाच्या बुडीत क्षेत्रात पेरणी करणारे शेतकरी अडवीतात, काही ठिकाणी गाळ वाहुण नेण्यासाठी रस्त्यांच्या अडचणी येतात तर काही ठिकाणी नेमका गाळ कुठून काढावा याची माहिती शेतकर्यांना नसते. त्यामुळे समन्वयासाठी अधिकारी स्तरावर समिती गठीत करावी त्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या मदतीला संबंधीत विभागाचा इंजिनीअर दयावा असे ठरले. आता पर्यंत चिखली तालुक्यात 22 ठिकाणी लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे. याच अनुशंगाने जलयुक्त शिवार योजने मध्ये समाविष्ठ असलेल्या गावात साखळी बंधारे बांधून जलसाठे वाढविणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने संबंधीत अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ठिकाणी व जास्तीत जास्त फायदेशीर अशा प्रकल्पांच्या जागा निवडल्या पाहिजेत. आणी या जलयुक्त शिवार योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेती ओलीताखाली येवून तसेच त्या परीसरातील सिंचन क्षमता वाढणे आणी पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी झाला पाहिजे.