Breaking News

रिमांड होममधून मुले पळाली

 अहमदनगर । प्रतिनिधी । 01-  शहरातील बालसुधारगृहातून (रिमांड होम) रविवारी रात्री आठच्या सुमारास गुन्हेगार असलेल्या सहा मुलांनी पलायन केले. शिपायाच्या तोंडावर भाजीचा रस्सा फेकून मुलांनी पलायन केले. पलायन केलेल्या चार मुलांना चौपाटी कारंजा येथील तरुणांनी पकडून रिमांड होमच्या हवाली केले, मात्र दोन मुले फरार आहेत.
रविवारी रात्री आठच्या सुमारास चौपाटी कारंजा परिसरातून काही मुले पळत असल्याचे चंद्रशेखर आझाद मित्र मंडळाचे कार्यकर्ते मयूर जोशी आणि मयूर बोचुघोळ यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या मुलांचा पाठलाग केला. 
त्यांच्या मदतीला चौपाटी कारंजा परिसरातील इतर तरुण आले. तीन मुले एका अपार्टमेंटमध्ये घुसल्याचे त्यांनी पाहिले. तर एक मुलगा एका घरात घुसला होता. तरुणांनी त्या मुलांची चौकशी केली असता ते रिमांड होममधून पळून आल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी त्यांना गाडीवर बसवून तातडीने रिमांड होमच्या हवाली केले. जेवणाच्या वेळी बाहेर आलेल्या मुलांनी शिपायाच्या तोंडावर भाजीचा रस्सा फेकून पळ काढल्याचे त्या मुलांनी सांगितले. मुलांना रिमांड होममध्ये नेले असता तेथेही मुलांनी गोंधळ घातला. एक ट्युब फोडली आणि ताट डोक्यावर मारून घेतले. अत्याचार आणि खुनाच्या गुन्ह्यातील ती मुले आरोपी असल्याची माहिती आहे. दोन मुले मात्र फरार झाली आहेत. याबाबत मयूर जोशी यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना थेट माहिती दिली. त्यांनी रिमांड होमच्या सुरक्षेबाबत उपाय करण्याची ग्वाही दिली. दरम्यान या प्रकाराबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद 

नव्हती.