Breaking News

केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री मिश्रा यांचा जिल्हा दौरा

 अहमदनगर । प्रतिनिधी । 08 - केंद्रीय सुक्ष्म  लघु आणि मध्यम उद्योग मंत्री मिश्र यांचा नगरजिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  मंगळवार दि. 9 फेब्रुवारी,2016 रोजी सकाळी 9.00 वाजता  पुणे येथून मोटारीने नगरकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता नगर येथे आगमन. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजता चार्टर्ड अकौंटंट, व्यापारी  आणि उद्योगपती यांचे समवेत प्रस्तावित बजेट व अपेक्षा संबंधी चर्चा. ( स्थळ - सी.ए.भवन, नक्षत्र लॉन समोर, बुरुडगांव रोड, अहमदनगर),  दुपारी 1.00 ते 3.00 वाजेपर्यंत राखीव.  दुपारी 3.00 ते 4.30 वाजेपर्यंत  स्थानिक कार्यकर्ता संमेलनास उपस्थिती. (स्थळ- लक्ष्मीनारायण मंगलवार कार्यालय, टिळक रोड, नगर) दुपारी 4.30 वाजता टिळक रोड, अहमदनगर येथूनएम.आय.डी.सी, अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 4.40 वाजता एम.आय.डी.सी अहमदनगर येथे आगमन. दुपारी 4.40 ते 5.00 वाजेपर्यंत एम.आय.डी.सी जिमखाना येथे लघु उद्योजक यांचे समवेत चर्चा. आगामी बजेट करिता सूचना तथा  प्रधानमंत्री  मुद्रा योजना कर्ज वितरण कार्यक्रमास उपस्थिती.