हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त नाईंटी सिक्स के ग्रुपच्यावतीने म्हाळसा वेषभूषेचे आयोजन
। प्रतिनिधी । 08 - संक्राती नंतर सर्वत्र हळदी कुंकुवाचे सामुहिक कार्यक्रम सध्या सर्वत्र होत आहेत. नगरमधील नाईंटी सिक्स के ग्रुपच्या वतीने हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमा बरोबरच पारंपरिकता जोपासण्यासाठी महिलांना नऊवारी साडीत येण्याचे निमंत्रण दिले होते.
तसेच सध्या गाजत असलेल्या खंडोबाच्या सिरीयलचा प्रभाव लक्षात घेता म्हाळसा वेशभूषा व ऊखाना स्पर्धा घेण्यात आली .त्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .
आकर्षक व पारंपरिकबैठक व्यवस्था , मोठ्या समई, पारंपारिक सुवर्ण आभूषणांनी नटलेल्या म्हाळसा वेशभूषेतील महिलांनी वातावरण आतिशय सुंदर व नयनरम्य झाले होते. फुगड्या झिमा खेळून यावेळी महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन नाईंटी सिक्स के ग्रुपच्यारश्मी आरडे, जोती पिसारे, प्रियंका पिसोटे, आश्विनी तावरे, क्रांती कडू, शीतल वाकळे व ग्रुपच्या सर्व सदस्यांनी केले होते. म्हाळसा वेशभूषा परिक्षण डॉ.चोभे, शीतल गांधी, छाया खराडे यांनी केले.उत्कृष्ट म्हाळसा वेशभूषा विजेत्या सौ.रचना काकडे ,ज्योती दाभाडे, डॉ. मीना पोटे यांना पारितोषिके देण्यात आली.