Breaking News

जामखेड तालुकाध्यपदी रवी सुरवसे यांची निवड

 जामखेड । प्रतिनिधी । 08 -  भाजपा  जामखेड तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत येथील विश्रामगृहात तालुक्यातील  ईच्छूक पक्ष कार्यकर्त्यांच्या मुलाखती  घेण्यात आल्या. यावेळी पक्ष  निरिक्षक नितीन कापसे यांच्यासह सभापती डॉ भगवान मुरूमकर,  बाजार समितीचे  सभापती गौतम उतेकर, भाजपा  युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत मोरे,  जेष्ठ कार्यकर्ते दिलीप बाफना , पोपट  राळेभात , विजय गुंदेचा , शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात , पणन  संचालक  डॉ. ज्ञानेश्‍वर झेंडे , पांडूरंग  उबाळे,  सुभाष जायभाय , जोती  क्रांती पतसंस्थेचे अध्यक्ष आजीनाथ  हजारे, विलास मोरे ,मजूर फेडरेशनचे संचालक मनोज  कुलकर्णी, मनोज राजगूरू ,काशीनाथ ओमासे, प्रवीण चोरडिया , हिरालाल  गुंदेचा ,संजय गोपाळघरे, डॉ दिपक वाळूंजकर , विलास मोरे ,नगरसेवक  अमित चिंतामणी, बिबीशन धनवडे, महेश निमोणकर ,केशव वनवे , बाजीराव गोपाळघरे ,रामभाऊ रसाळ ,शिवकुमार गुळवे  यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते  उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्षपदासाठी तब्बल 61 जणांनी मुलाखती दिल्या आहे. या सर्वांच्या मुलाखती पालकमंत्री शिंदे व पक्ष निरिक्षक कापसे यांनी घेतल्या आहे. तालुकाध्यक्षपदासाठी सभापती डॉ मुरूमकर, सूर्यकांत मोरे, दिलीप बाफना ,आजीनाथ हजारे , सुभाष जायभाय ,  डॉ ज्ञानेश्‍वर झेंडे, संजय गोपाळघरे यांच्यासह 61 जणांनी  मुलाखती दिल्या. यापैकी प्रमुख पदाधिकार्‍यांची बंद खोलीत बैठक घेवून  रवी सूरवसे यांच्या नावावर एकमत करण्यात आले.
यावेळी सुसरे यांनी बोलताना सांगितले की, सध्या पक्षवाढीसाठी काम करत आलो असुन याचीचही पावती आहे.     भाजपाचे तालूकाध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या तीन वर्षात  जामखेड नगर परिषद वगळता सर्व निवडणूकांमध्ये  पक्षाला यश मिळविले आहे. येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती  निवडणूकीत पक्षाला सर्वच्या सर्व जागा जिंकून देवू .याचा आम्हाला विश्‍वास आहे. तालूकाध्यक्ष म्हणून फेरनिवड करून माझ्यावर जो विश्‍वास दाखविला आहे तो आपण सार्थ करणार  आहोत.’ केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने अनेक योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.