Breaking News

टाटा मोटर्सची नवीन सिग्ना बाजारात दाखल

नाशिक/प्रतिनिधी। 08 - देशातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने सियाम ऑक्टो एक्सपो 2016 मध्ये प्रथम व अवजड गटातील वाहनांचा समावेश असलेली नवीन सिग्ना श्रेणीतील वाहने प्रदर्शित केली.
 विविध प्रकारच्या मॉडेलमध्ये उपलब्ध असलेल्या सिग्ना श्रेणीतील व्यावसायिक वाहने ही प्रामुख्याने मध्य व अवजड वाहनांची गरज असलेल्या व्यावसायिकांसाठी विशेष करून तयार करण्यात आली असून टाटा मोटर्सचे अनुभवाने सिद्द झालेले कौशल्य व नवीन रचनेच्या मोठ्या केबिन असलेल्या या वाहनांमुळे जागतिक दर्जाच्या मालवाहू वाहनाचा अनुभव मिळेल. ऑक्टो एक्स्पो 2016 टाटा मोटर्सने सिग्ना श्रेणीतील सिग्ना 4923 एस ट्रॅक्टर, सिग्ना 3118 टी मल्टिअ‍ॅक्सल ट्रक व सिग्ना 2518 के टिप्पर ही तीन वाहने प्रदर्शनासाठी मांडली.