Breaking News

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सभेत विविध योजनांविषयी चर्चा

येवला/प्रतिनिधी। 08 - स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची सभा अनकु टे येथे पक्ष कार्यालयात उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे होते. बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील समस्या, पक्षवाढीबाबत चर्चा करण्यात आली.
विशेष घटक योजना ही एक लाखावरून तीन लाख करण्यात यावी, रमाबाई घरकुल योजनेच्या दारिद्रयरेषेची अट रद्द करावी, सन 2015 पर्यंत भूमिहीन व बेघर लोकांचे अतिक्रमण कायम करण्यात यावे, विधवा व परित्यक्ता महिलांना आर्थिक निकषाप्रमाणे वेतन चालू करावे, गायरान जमिनी या मागासवर्गीयांना द्याव्यात, दुष्काळी परिस्थितीमुळे मागेल तेथे चारा डेपो सुरू करावा, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना प्रत्येक गावात चालू करावी, विशेष घटक योजनेचा कालावधी ठरविण्यात यावा, जातीच्या दाखल्याची 50 वर्षांच्या पुराव्याची अट रद्द करावी, शहरातील गंगादरवाजा भागातील घरकुल योजनतील इमारतीजवळ सुलभ शौचालय बांधावे आदि मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पक्षात अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. त्यांचे यावेळी स्वागत क
रण्यात आले. प्रास्ताविक शशिकांत जगताप यांनी केले.बैठकीस स्वारिप तालुका कार्याध्यक्ष विजय घोडेराव, शहराध्यक्ष विक्रम पवार, अमोल निकम, भाऊसाहेब गरुड, चांगदेव गाढे, नवनाथ पगारे, जगन्नाथ पवार, श्रीधर अहिरे, विधाता अहिरे, अजय पानपाटील, हरिभाऊ अहिरे उपस्थित होते. विजय घोडेराव यांनी आभार मानले.येवल्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा 
येवला : श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्‍वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भाटगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण मंडळाअंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.