विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचे पुरावे नाही
नवी दिल्ली, 17 - जेएनयूप्रकरणी चौकशी सुरु असून अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने राष्ट्रविरोधी घोषणा दिल्याचे पुरावे नसल्याचेही गृहमंत्रालयाच्या सूत्रांची माहिती दिली आहे. पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.
दुसरीकडे, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यातही जेएनयूवरील वादाचेच पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी अटकेतील कन्हैयाकुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याबद्दल आक्षेप घेतला. दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी केलेली घोषणाबाजी आक्षेपार्ह असल्याचा मुद्दा सरकारने रेटला. आपण भाजपचे नव्हे तर देशाचे पंतप्रधान आहोत. यामुळे प्रत्येक कारवाई देशाचा नेता म्हणून करू, पक्षाचा नव्हे, असे आश्वासन मोदींनी विरोधी पक्षांना दिले. दरम्यान, एनयूटीएच्या जवळपास 600 पेक्षा प्राध्यापकांनी कुलगुरुंची भेट घेऊन राष्ट्रविरोधी घोषणा करणार्या विद्यार्थ्यांचा निषेध नोंदवला. काही प्राध्यापकांनी पोलिस कारवाईलाही विरोध दर्शवला आहे.