Breaking News

आयुष कुंभ 2016 पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

नाशिक/प्रतिनिधी। 22 - संपुर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार व योग, होमिओपॅथिक या विविध थेरपीच्या माध्यमातून जनसेवा करणार्‍या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिंचे 3 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 
सदर संमेलनात मागील 10 वर्षे सलग या क्षेत्रात प्रामाणिकपणे जनसेवा करणार्‍या व्यक्तिंना सर्वोत्कृष्ट आयुषरत्न हा पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. ज्या व्यक्तिंनी सदर पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठवायचे आहेत त्यांनी आपला बायो-डाटा, वृत्तपत्रातील कात्रणे, फोटो हे सर्व साई समर्थ नॅनो क्लिनीक, संदर्भ रूग्णालयासमोर शॉप नं. 12, कवास मार्केट, शालीमार चौक, नाशिक येथे पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते प्रस्ताव द्यावेत असा आवाहन संयोजक समितीने केलेले आहे. सदर प्रस्ताव 25 फेब्रुवारी 2016 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. संपर्कासाठी मोबाईल. 9373909957 / 9890626432 नाशिक शहरात आयुष कुंभ 2016 या संमेलनाचे आयोजन दिनांक 29 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत शिवगोरक्ष योगपीठ के.के.वाघ कॉलेजजवळ, अमृतधाम, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आलेले असून इच्छुक वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती व नागरीकांची नाव नोंदणी करण्यात येईल. सदर संमेलनात उपस्थित व्यक्तींना निसर्गोपचार, आहार, तज्ञ व्यक्तींचे व्याख्याने व छापील पुस्तके माहितीपत्रक अल्पदरात ुपलब्ध करून देण्यात येणार आहे.