Breaking News

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक गिलानी यांना अटक

नवी दिल्ली, 16 -  देशद्रोहाच्या आरोपाखाली दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एस ए आर गिलानी यांना अटक करण्यात आली आहे. प्रेस क्लबमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याने दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा एस ए आर गिलानी यांना ताब्यात घेतलं. संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गिलानी यांची चौकशी झाली. त्यांनतर पहाटे 3 च्या सुमारास गिलानींना अटक केली. गिलानी यांनी अफजल गुरु आणि मकबूल बट यांना शहीद सांगून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिल्ली विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक अली जावेद यांची तीन वेळा चौकशी केली आहे. अली जावेद यांच्यासह प्रेस क्लबचे ऑफिस सेक्रेटरी जितेंद्र सिंह यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांच्या जबानीतूनच समोर आलं की, माजी प्राध्यापक गिलानी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी भारतविरोधीत घोषणा दिल्या होत्या.