धोनीने कसोटी सामना 2014 मध्ये फिक्स केला होता ?
नवी दिल्ली, दि. 8 - भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनी मॅच फिक्सिंग मध्ये अडकला. 2014 सालची भारत आणि इंग्लंडमधली मॅन्चेस्टर कसोटी सामना फिक्स होता, असा खळबळजनक दावा तेव्हांचे टीम इंडियाचे मॅनेजर आणि आत्ताचे डीडीसीएचे सेक्रेटरी सुनिल देव यांनी केला आहे. एका हिंदी दैनिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुनिल देव यांनी हा धक्कादायक दावा केला आहे.
पावसामुळे पिचची अवस्था पाहता टॉस जिंकलो तर बॉलिंग घ्यायचा निर्णय टीम मीटिंगमध्ये झाला होता, पण धोनीने बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आम्हाला धक्का दिला, असे देव या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटले आहेत. धोनीच्या या निर्णयामुळे इंग्लंडचे माजी कॅप्टन जेफ्री बॉयकॉट यांनाही धक्का बसल्याचे देव म्हणाले आहेत. भारताने हा सामना एक डीव आणि 54 धावांनी गमावला होता. दरम्यान, 2014 साली इंग्लंडविरुद्ध मॅन्चेस्टरमध्ये झालेला मानहानीकारक पराभव हा भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने फिक्स केल्याच्या दाव्यावरून दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या माजी सचिवाने घुमजाव केले आहे. वृत्तपत्राने हे स्टिंग ऑपरेशन जारी करताच सुनील देव यांनी घुमजाव केले आहे. इतकेच नाही, तर या वृत्तपत्राला कोर्टात खेचणार असल्याचा दावाही केला आहे.