Breaking News

अब्रुनुकसानीपोटी धोनीचा 100 कोटींचा दावा


नवी दिल्ली/प्रतिनिधी,दि.11 -  मॅच फिक्सिंगचा आरोप करणार्‍या एका दैनिकाविरुद्ध भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात नोटीस पाठविली आहे. इंग्लंडविरुद्ध 2014 मध्ये एक कसोटी सामना फिक्स करण्याचा आरोप संबंधित दैनिकाने केला होता. या सामन्यासाठी सुनिल देव हे भारतीय संघाचे व्यवस्थापक होते.
ओलसर खेळपट्टी असतानाही धोनीने या सामन्यात जाणूनबुजून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन दिवसांतच भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागल्याचा दावा संबंधित दैनिकाने केला होता. आता धोनीच्या वकीलाने नऊ पानांची नोटीस दिली आहे
. त्यामध्ये केवळ बदनामीच्या हेतूने माझ्या अशीलावर असे आरोप करण्यात आले आहेत. या माहितीचे स्रोत असणारे भारतीय क्रिकेटचे संघाचे तथाकथित अधिकारी (सुनिल देव) यांनीही हे वृत्त फेटाळून लावले आहे‘, असे म्हटले आहे. तसेच या बदनामीमुळे जो त्रास सहन करावा लागला त्याची नुकसानभरपाई म्हणून 100 कोटी रुपयांचा दावा करण्याचा माझ्या अशीलाला अधिकार असल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे.