भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनी विजय
सिडनी, 23 - मनीष पांडेच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने सिडनीच्या पाचव्या आणि अखेरच्या वन डेत सहा विकेट्स राखून विजय साजरा केला आणि लाज राखली. या सामन्यात 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मनीषने नाबाद 104 धावांची खेळी केली.
त्याआधी रोहित शर्माचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. तर शिखऱ धवन 78 धावांवर बाद झाला. पण या तिघांच्या झुंजार खेळीने भारताला ऑस्ट्रेलिया दौर्यावर पहिला विजय मिळवून दिला आणि व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-1 अशी जिंकली. सिडनीच्या पाचव्या वन डेत रोहित शर्माचे शतक अगदी थोडक्यात हुकले. ऑस्ट्रेलियाच्या जॉन हेस्टिंग्जने रोहितला 99 धावांवर बाद केले. त्यामुळे विजयासाठी 331 धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था 35व्या षटकात तीन बाद 231 अशी झाली.