Breaking News

पल्स पोलिओ मोहिमेची तयारी पुर्ण


 बुलडाणा/ प्रतिनीधी। 6 - बुलडाणा जिल्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील  0- 5 वर्षीय बालकांना राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 2 लाख 77 हजार 286 बालकांना पल्स पोलीओ डोस दयावयाचा असुन त्यांची प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असुन या कामी स्वयंसेवी संघटना आणि आशा वर्कर यांनी पुढाकार घेवुन लसीकरण मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन आज जिल्हाधिकारी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात आरेागय विभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहीम याबात संमन्वय समितीची बैठक् आयोजित केली त्यावेळी त्या अध्यक्षपदावरुन बोलत होत्या.  यावेळी उपाध्यक्ष् जिल्हा परिषद  पाडुरंग खेडेकर,  अप्पर पोलीस अधिक्षक श्‍वेता खेडेकर, निवासी उपजिल्हाकारी नरेंद्र टापरे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन, सहाय्यक पुरवठा अधिकारी सुनिल शेळके, उपायुक्त अन्न व प्रशासन चव्हाण, मुख्याधिकारी संजिव ओहळ,  जिल्हा आरेाग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक पारधे,तथा विभाग प्रमुख उपस्थित होते.  मुधोळ म्हणाल्या की, 1913 पासून  पल्स पोलीओचा एकही रुग्ण आढळला नसुन तो पुढेही कोणालाही होवु नये म्हणुन ही मोहीम चालू राहणार आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांस डोस पाजावा त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्टेशन आदी  विविध ठीकाणी 288 बुध राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी लसीकरण केंद्रातील मनुष्यबळ, आयपीपी साठी टीम, पर्यवेक्षक, मोबाईल टीम, रात्रीसाठीची टीम याबाबत माहिती घेवुन ही मोहीम वाडया आणि अतिदुर्गम भागातही राबविण्याचे यावेळी यंत्रणेस  सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी यावेळी लसीकरण मोहीमेसाठी मुनष्यबळ, आयएलआर ,डिफ्रीजर, कोल्ड बॉक्स, व्हॅक्सीन कॅरिअर, आईस पॅक, व्हॅक्सीन डेासेस, वाहन व्यवस्था, उपलब्ध साधन सामुग्रीचे उपलब्धतेबाबत बैठकीत माहिती देवुन  ही मोहीम दिनांक 17 जानेवारी व 21 फेब्रुवारी 2016 रोजी राबविण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.