Breaking News

आता पोस्टरबाजांवर गुन्हे दाखल करणार -सुनील केंद्रेकर

औरंगाबाद, 31 -  आता कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि सर्वसामान्य लोकांना वाहतुकीला अडथळा कराल तर थेट फौजदारी कारवाई करू, मग तो राजकीय पक्षाचा नेता असो की, एखाद्या खासगी कंपनीचा मालक, आम्ही कोणालाही जुमानणार नाही, असा इशारा मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे.
न्यायालयाला अहवाल पाठवायचा असल्याने शासनाशी पत्रव्यवहार केल्यानंतर मनपाने गेल्या आठवड्यात पोस्टरबाजांची घाण साफ केली. मात्र, यानंतर तीच ठिकाणे, काही चौक आणि रस्त्यांची ‘डीबी स्टार’ने पाहणी केली असता काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी आणि संस्था-संघटनांनी पुन्हा नव्याने पोस्टरबाजी केल्याचे दिसून आले. यावर 22 जानेवारी रोजी ‘शहर विद्रुपीकरण अजूनही सुरूच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली आहे. पोस्टर्स लावून सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण आणि वाहतुकीला अडथळा निर्णाण करण्याची शहराची जुनी परंपरा आहे. आता ही परंपराच मोडून काढण्याचा निर्धार आयुक्तांनी केला आहे. शहरात नेमकी कुठे-कुठे पोस्टर्स चिकटवलेली आहेत,
याची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे केंद्रेकरांनी सांगितले आहे.