Breaking News

तिरुपती-नगरसोल रेल्वेच्या दहा विशेष फेर्‍या

हिंगोली, 31 - दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात ता. 5, ता. 12, ता. 19 व ता. 26 या शुक्रवारी तिरुपती येथून ही रेल्वे निघणार आहे. ही रेल्वे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता निघणार असून तिरुपती, रेणीगुंटा, गुडूर, तेनाली, गुंटूर, नलगोंडा, सिकंदराबाद, बेगमपेठ, लिंगमपल्ली, विकाराबाद, बीदर, भालकी, उदगीर, लातूररोड, पानगाव, परळी, गंगाखेड, परभणी, मानवतरोड, पातूर, जालना, 
औरंगाबादमार्गे नगरसोल येथे दुसर्‍या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही रेल्वे शनिवारी ता. 6, ता. 13, ता. 20 व  ता. 27 रोजी रात्री दहा वाजता नगरसोल येथून निघणार असून दुसर्‍या सोमवारी सकाळी चार वाजता तिरुपती येथे पोहोचणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.