Breaking News

अखिल भारतीय पँथर क्रांतीवीर सेनेचे सिव्हील सर्जन यांना निवेदन

 नाशिक/प्रतिनिधी। 31 - सामान्य रूग्णालयातील तज्ञ डॉक्टर्स यांसह इतर कर्मचारी यांच्या निष्काळजी पणाबाबत तसेच इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय पँथर क्रांतीवीर सेनेच्यावतीने सामान्य रूग्णालय नाशिकचे सिव्हील सर्जन यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
सामान्य रूग्णालयातील कार्यरत जबाबदार तज्ञ डॉक्टर्स नियोजित वेळेनुसार रूग्णालयात हजर नसतात. अत्यावस्थ रूग्णांवर उपचार करतांना संबंधित सहकारी डॉक्टर्स, नर्सेस यांच्याकडे रूग्णांचे नातलग पाठपुरावा करता असतांना त्यांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी त्यांना तुच्छतेची वागणुक संबंधीतांकडून दिली जाते. अप्रशिक्षीत सुरक्षा रक्षकांकडून दबाव आणला जातो, अनेक वेळा रूग्णांना पुणे येथे उपचारासाठी जाण्यासाठी सांगण्यात येते. रूग्णांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास दिला जातो. याबाबत दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
तसेच, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकार्‍यांची चौकशी समिती नियुक्त करून सदर संघटनेचे कमीत कमी 25 टक्के तज्ञ सदस्य समाविष्ट करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. रूग्णांना योग्य सेवा मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे.
निवेदनावर अखिल भारतीय पँथर क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा वाहुळे यांच्यासह प्रदेश अध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष दत्ता पाईकराव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भगवान तालखे, उत्तर महाराष्ट्र सचिव दिलीपकुमार आहेर, संघटक निमदेव हिरे, मराठवाडा अध्यक्ष प्रकाश पटेकर, मराठवाडा उपाध्यक्ष बबन वाकळे, जिल्हा संघटक राम प्रधान, नाशिक शहर प्रमुख अभिजित कांबळे, उपजिल्हा अध्यक्ष कानिफनाथ चौधरी, शहर युवा अध्यक्ष बजरंग वाकळे, सातपूर अध्यक्ष राजू पटेकर, नवीन नाशिक अध्यक्ष संतोष उन्हवणे, नविन नाशिक कार्याध्यक्ष साहेबराव जाधव, महिला आघाडीच्या कमलाताई इंगळे, मिराबाई निमदेव हिरे, मोनिका संतोश बागुल, गिरजाबाई ढवळे, मिराबाई पगारे, पुजा वानखेडे, गुड्डूभाऊ गवई, ज्ञानेश्‍वर डोली डुबेरकर, रविंद्र जगताप, अनिल विधाते, विनोद भालेराव, बॉबी पगारे, निलेश बच्छाव, मधुकर गाडे, कैलास ढवळे, गोकुळ भालेराव, अशोक भुजबळ, शपीक पठाण, इरफान पठाण स्टीफन आढाव आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.