Breaking News

हैद्राबाद केंद्रिय विद्यापीठाच्या कुलगुरूंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- भिमशक्ती

 नाशिक/प्रतिनिधी। 31 - संपूर्ण भारतातील विद्यार्थी वर्गामध्ये खळबळ उडविणारी घटना म्हणजे हैद्राबाद केंद्रिय विद्यापीठात पीएच.डी.चा अभ्यासक्रम करणार्‍या रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या. सदरचा विद्यार्थी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट फेडरेशन, स्टुडंट असोसिएशन या विद्यार्थी संघटनेचा सक्रीय नेता व कार्यकर्ता होता. त्याने वेळोवेळी बहुजन समाजाच्या हिताकरीता असणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन विद्यापीठ आवारात केले होते. याबाबतचा राग संबंधित विद्यापीठ प्रशासन व ए.बी.व्ही.पी. सारख्या विद्यार्थी संघटनेच्या समर्थकांना होता. त्यामधूनच सदर विद्यार्थ्याला महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले. सदर विद्यार्थी हा सलग तीन महिने कॉलेज कॅम्पसच्या वर्‍हांड्यात झोपत होता व त्यानंतर त्याने आत्महत्या केली किंवा त्याचा मर्डर करून संबंधित व्यक्तीने आत्महत्येचा बनाव उभा केला असावा. म्हणून सदर घटनेची सी.बी.आय. चौकशी व्हावी व हैद्राबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याकरीता भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी, नाशिक यांना निवेदन देण्यात आले. 
निवेदनावर अविनाश आहेर, चंद्रकांत बोंबले, सूर्यकांत आहेर, भरत आहेर, लक्ष्मीकांत निकम, निलिमा साठे, नूर सैय्यद, अंजली वैद्य, कविता गायकवाड, वंदना उन्हवणे, मोहन जगताप, सविता आव्हाड, संजय सानप, रंजना नेरकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.