येवला बस आगारामध्ये महाराष्ट्र एस. टी. कामगार सेना फलकाचे अनावरण
येवला/प्रतिनिधी। 25 - येवला आगारात कामगार संंघटणेला सुरुंग लागत असून मान्यता प्राप्त संघटना असतानांही असंख्य प्रमुख पदाधिकार्यांनी एस. टी. कामगार सेनेत प्रवेश घेतल्याचे बस आगाराच्या प्रांगणात भव्य फलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस सुभाष जाधव, विभागीय सचिव देवा सांगळे, सह सचिव संजय धिवर, अध्यक्ष शाम इंगळे यासह शिवसेनेचे संभाजी पवार, राजु लोणारी, भास्कर कोेंढरे, कुणाल दराडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी वाल्मीक गोरे होते. फलकाचे अनावरण सुभाष जाधव यांचे हस्ते झाल्यानंतर दत्त मंदीर प्रांगणात सभा घेण्यात आली. यावेळी सुभाष जाधव यांनी काम संघटनेवर तोफ डागली. कुणाचीही दादागिरी खपऊन घेतली जाणार नाही. जशाच तसे उत्तर देण्यासाठी आता कामगार सेना सज्ज झाली असून दिवाकर रावते यांनी कामगारांच्या हितांची धोरणे राबविण्याचे ठरविले असून लवकरच कामगार करार संपन्न होईल. पहिल्यांदा कामगारांचे हित जपणारे परीवहन मंत्री राज्याला लाभल्याने सर्वच कामगारांना आता न्याय मिळणार असल्याने सर्व कामगारांनी कामगार सेनेत सामील व्हावे असे आवाहन सुभाष जाधव यांनी केले. यावेळी संभाजी पवार, कुणाल दराडे यांची भाषणे झाली. प्रास्तावीक शाम इंगळे यांनी केले. अप्पासाहेब जाधव यांनी आगाराच्या वतीने समस्या मांडल्या. या प्रसंगी रवी काळे, जिल्हा दुध संघाचे चेअरमन शरद लहरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी नुतन कार्यकारणी कामगार सेनेच्या वतीने जाहीर करण्यात आली. ती अशी, अध्यक्ष संतोष नागरे, उपाध्यक्ष नितीन शेवाळे, रवी गायकवाड, प्रभाकर कवडे, पंडीत पवार, कार्याध्यक्ष अनिरुद्ध शिंदे, सचिव आप्पासाहेब जाधव, सहसचिव वसंत अलगट, प्रमोद लहरे, विलास मोरे, रविंद्र जगताप, खजीनदार सचिन नागरे, संघटक मधुकर ढाकणे, प्रसिद्धी सचिव वाल्मीक भताने, सल्लगार के. सी. रोहम, कायदे सल्लागार नानासाहेब आसने, महिला प्रतिनिधी गया बारगेज, शोभा पवार, धनश्री गुरधाळकर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चांगदेव मगर, एस. बी. त्रिभुवन, संदीप मोरे, अरुण धणवटे, अन्ना जमधडे, विकास बिलवरे, अनिस शेख, एस.एस. यादव, पी. एन. नागरे, सुदाम भड, एस. बी. झळके, व्ही. आर. शिंदे यांनी परिश्रम घेतले.