न्यायालय आवारात हास्य मैफल
/प्रतिनिधी। 25 - येथील नाशिक बार असोसिएशनतर्फे शुक्रवार दि. 29/1/2016 रोजी वकील, न्यायाधीश वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांचेसाठी वकील चेंंबर बिल्डिंग नं. 2 येथे सायंकाळी साडेपाच वाजता ‘हास्ययोग’ मार्गदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम जिल्हा हास्ययोग समन्वय समितीतर्फे राबविण्यात येणार आहे.
जिल्हा न्यायाधिश उर्मिला जोशी (फलके) यांची या कार्यक्रमास प्रमुूख उपस्थिती राहणार आहे. समितीच्या अध्यक्षा सौ. आदिती वाघमारे, डॉ. सुषमा दुगड, अॅड वसंतराव पेखळे व त्यांचे सहकारी उपस्थितांना मानसिक व शारिरीक आरोग्यासाठी हास्ययोग कसा उपयुक्त आहे. तसेच तणावमुक्त जीवनासाठी हास्ययोग उपचार पध्दती कशाप्रकारे काम करते याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध ‘हास्यप्रकारांची’ प्रात्यक्षिके करून दाखविणार आहेत.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणावरून वकील वर्ग हा इतर व्यावसायिकांचे तुलनेने सतत जास्त प्रमाणात तणावाखाली वावरत असतो. या तणावातून बाहेर पडण्यासाठी हास्ययोग ही अतिशय सोपी उपचार पध्दती असल्याचे कार्यक्रम आयोजकांचे म्हणणे आहे.
कार्यक्रमास बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सन्माननीय सदस्य अॅड. जयंत जायभावे, अॅड. अविनाश भिडे, जिल्हा सरकारी वकील अॅड. राजेंद्र घुमरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नितिन ठाकरे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी उपाध्यक्ष अॅड बाळासाहेब आडके, सचिव अॅड. सुरेश निफाडे, सहसचिव अॅड. जालींदर ताडगे, अॅड. सौ. मंगला शेजवळ, खजिनदार अॅड. हेमंत गायकवाड, सदस्य अॅड. संजय गिते, अॅड. माणिक बोडके, ॅड. दिपक ढिकले, अॅड. अपर्णा पाटील, अॅड. अतुल लोंढे प्रयत्नशील आहेत.