दुचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकाची मालिका
नाशिक/प्रतिनिधी। 25 - जिल्ह्यातील दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येत असून या क्रमांकाचे शासकीय विहीत शुल्काबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रदर्शित करण्यात आली आहे.
आकर्षक क्रमांक घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज 27 जानेवारी 2016 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 दरम्यान कार्यालयात जमा करणे आवश्यक राहील.
अर्जासोबत केंद्रीय पत्त्याच्या पुराव्याची उदा. आधारकार्ड, वीजबील, घरपट्टी साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. ज्यांचे नावे वाहन असेल त्याच नावाने अर्ज सादर करावा. तसेच अर्जासोबत अर्जदाराने फोटो ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इ. ची साक्षांकित प्रत सादर करावी लागेल, पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या किँवा शेड्युल बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नावे भरणे तसेच त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
एकदा राखुन ठेवलेल्या नोंदणी क्रमांक बदलून किँवा रद्द करता येणार नाही, एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसर्या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रकमेचे डिमांड ड्राफ्ट बंद पाकीटात सादर करावेत. जो अर्जदार विहित शुल्कापेक्षा अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करेल त्यास सदर पसंतीचा क्रमांक देण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.