Breaking News

शहरात क्रांतीज्योती सावित्रीमाईफुलेंची जयंती उत्साहात


 श्रीगोंदा । प्रतिनिधी । 04 -  क्रांतीज्योती सावित्राबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी मिरवणूक तर काही ठिकाणी पुष्पमाला अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती 
श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कालेज तसेच तहसील कार्यालय सामाजिक संस्था तसेच शहरातील इंदिरा गांधी नागरी पतसंस्थेच्या वरती , शनि चौक या सर्व ठिकाणी सावित्राबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यात त्यांनी केलेला सामाजिक संघर्ष साम्ज्यापुढे परत मांडण्यात आला त्यात 1 मे, इ.स. 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या.1 जानेवारी, इ.स. 1848 रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरलीया शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही 2-3 मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी अ‍ॅन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा 2015 सालीही चालू आहे. (मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे 1847 मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी 1849 मध्ये पहिली उे-शव शाळा काढली, पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या.)सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला.... असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.अश्या अनेक गोष्टीवर विचार वंत नागरिकाकडून  प्रकाशझोत टाकण्यात आला 
याविविध ठिकाणच्या  कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता पानसरे हरिदास शिर्के तहसीलदार वंदना खरमाळे बंडूपंत कोथिबिरे अनुराधा ठवाल भाऊसाहेब गोरे संभाजी बोरुडे मुकुंद सोनटक्के प्रा तुषार शिंदे शहाजी खेतमाळीस आदी मान्यवर हजर होते