विषबाधेमुळेच सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू
नवी दिल्ली, 24 - विषबाधेमुळेच सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पोटात अल्प्रॅक्स औषधाचा अंश होता असा एम्स मेडिकल बोर्ड सर्वसंमतीने निष्कर्ष काढला आहे. सुनंदा यांच्या व्हिसेरा नमुन्यावर एफबीआय अहवालाबाबत बोर्डाने आपले मत दिले.बोर्डाने सुनंदा यांच्या शरीरावर विशेष खूण पाहता इंजेक्शनने विष देण्याची शक्यता फेटाळली नाही. एफबीआय अहवालाने त्यांच्या शरीरात लिडोकाइन असल्याची पुष्टी केली आहे. मेडिकल बोर्डाचे मत दिल्ली पोलिसांना कळविण्यात आले आहे.