Breaking News

प्रिया बापट झाली ‘वजनदार’

अभिनेत्री प्रिया बापट हिने वजनदार या चित्रपटासाठी चक्क एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा ते पंधरा किलो वजन वाढविले आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटातील अभिनेत्रीदेखील वजनदार झाल्याचे कळते. हीच गोष्ट मराठी चित्रपटांसाठी चांगली म्हणावी लागेल. कारण पूर्वी बॉलिवूडमध्ये योग्य भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्रींकडून लूक चेंज, स्टंट करणे, वजन वाढविणे या गोष्टी ऐकायला मिळायच्या. आता हाच बदल मराठी इंंंंंंंंडस्ट्रीमध्ये होताना दिसत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. कारण योग्य भूमिकेला न्याय देण्यासाठी त्या भूमिकेत जावेच लागते नेमकी तीच गोष्ट या प्रिया बापटने के
ली.