Breaking News

छगन भुजबळांना क्लिन चीट देणार्‍या अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश - उल्हास देबडवार आणि अतुल चव्हाण सक्तीच्या रजेवर

मुंबई/प्रतिनिधी । 03 - सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना क्लिन चीट देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण या दोघांना सरकारला माहिती न देता अहवाल परस्पर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्याप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. तसेच त्या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून दोघांच्याही खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने महाराष्ट्र सदन इमारतीच्या बांधकामप्रकरणी अहवाल सादर केला होता. या अहवालात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे नमूद करून छगन भुजबळ यांना क्लिन चीट देण्यात आली होती. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र सदन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आल्याचेही अहवालात म्हटले होते.