Breaking News

दलित विरुद्ध बिगरदलित अशा स्वरुपाचा जातीय रंग देऊ नका - स्मृती इराणी



नवी दिल्ली, 20 - हैदराबाद विद्यापीठामधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येस जातीय रंग देऊ नका, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ स्मृती इराणी यांनी बुधवार केले. हे प्रकरण दलित विरुद्ध बिगरदलित अशा स्वरुपाचे नसतानाही काही जणांकडून निव्वळ भावना भडकाविण्याच्या उद्देशार्थ असा प्रयत्न केला जात असल्याची टीका इराणी यांनी केली. 
वेमुला हा विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहामधून निलंबित केलेल्या पाच दलित विद्यार्थ्यांपैकी एक होता; व तो विद्यापीठाच्या आवारात गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करत होता. वेमुला याने आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या पत्रामध्ये कोणत्याही खासदाराचा वा राजकीय पक्षाचा नामोल्लेख नसल्याच्या वस्तुस्थितीकडे मनुष्यबळ मंत्र्यांनी लक्ष वेधले. याशिवाय, केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांच्याप्रमाणेच काँग्रेस पक्षाचे हनुमंत राव यांनी अशा स्वरुपाचे पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा स्वरुपाच्या घटना हैदराबाद विद्यापीठामध्ये गेल्या चार वर्षांपासून घडत होत्या, हे राव यांच्या पत्रावरुन स्पष्ट होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणामधील तथ्य जाणून घेण्यासाठी मंत्रालयातर्फे शोध पथक पाठविण्यात आले असून या समितीचा हा अहवाल आज संध्याकाळपर्यंत मंत्रालयास मिळणे अपेक्षित आहे. तेव्हा याप्रकरणी सर्वांनी अत्यंत जबाबदारीने‘ वागत भावना भडकाविण्यास कारणीभूत होऊ नये, असे आवाहन इराणी यांनी
यावेळी केले.