Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

 नाशिक/प्रतिनिधी। 31 - नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित्त शहराध्यक्ष आमदार जयवंतराव जाधव व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड रविंद्र पगार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  केला.
याप्रसंगी शहराध्यक्ष आ. जयवंतराव जाधव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांनी देशासाठी दिलेल्या बलिदाना विषयी विशेष उल्लेख केला, राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. भारतात त्यांनी चंपारणमधील शेतकर्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. 1930 मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे प्रतिनिधित्व केले. पण सध्या काहीजण खालेल्या मिठाला जागत नाही. त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. चंपारण, खेडा, मिठ्चे सत्याग्रह यासारख्या सत्याग्रहसाठी त्यांना अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले. त्यानी खेड्यांना खर्या भारताचे मूळ म्हणून पाहिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतासाठी दिलेले बलीदान हे खूप मोठे आहे. व देशाच्या  स्वतंत्रसाठी ज्यानी बलिदान दिले त्या हुतात्माना  दोन मिनिटाचे मौन पाळून आदरांजली वाहिली. 
यावेळी मुख्तार शेख, अंबादास खैरे, संजय खैरनार, भारत जाधव,  वैभव देवरे, गौरव गोवर्धने, प्रियांका शर्मा, सुरेखा काळे, मनोहर कोरडे, सालीमराज शेख, बाळासाहेब गीते, बाळासाहेब सोनवणे, शंकर मोकळ, अरविंद सोनवणे, सुरेश आव्हाड, अनिल परदेशी, अल्ताफ पठाण, अनिकेत ढगे, जयदीप पिसुटे, मेराज जोशी, रोहित धोंड, रोशनी पाटील, नंदा मथुरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.