Breaking News

रेसिडेंशियल पब्लीक स्कुलसाठी प्रवेश परिक्षेचे आयोजन


जालना, 9 - अपर आयुक्त विकास अमरावती यांच्या कार्यक्षेत्रात इंगˆजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये सन 2015-16 मध्य इयत्ता 5 वीत शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जमातीच्या मुला मुलींसाठी प्रवेश परिक्षा दि. 13 मार्च 2015 रोजी घेण्यात येणार असून या प्रवेश परिक्षेत जे विद्यार्थी मेरीट लिस्टमध्ये पास होतील त्यांना सन 2016-17 मध्ये इयत्ता 6 वीला इंगˆजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल स्कुलमध्ये 30 मुले आणि 30 मुलीना प्रवेश दिला जाईल.त्यासाठी शर्थी पुढीलप्रमाणे.
शासकीय आश्रमशाळा,अनुदानित आश्रमशाळा,जिल्हा परिषद व इतर प्राथमिक शाळांतील सन 2015-16 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वीत शिकत असलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र राहतील. तसेच विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्न 1 लक्ष इतक्या कमाल उत्पन्न मर्यादेच्या अधीन ज्यांचे उत्पन्न आहे असे विद्यार्थी पात्र ठरतील. सक्षम अधिकार्‍याचा उत्पन्नाचा दाखला जोडा, तसेच शासकीय,निमशासकीय सेवेतील कर्मचारी असलेल्या पलकांच्या पाल्यानां प्रवेश देणे अभिप्रेत नाही. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,औरंगाबाद अंतर्गत खालील प्रमाणे परिक्षा केंद्रावर समाविष्ट तालुक्यातील जिल्हयातील शासकीय,अनुदानित,जिल्हा परिषद,इतर मान्यताप्राप्त शाळांच्या परिक्षार्थी विद्यार्थ्याचा समावेश राहील. विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज भरुन मुख्याध्यापक शासकीय आश्रमशाळा बˆाम्हणी ता. कन्नड जि. औरंगाबाद व शासकीय आश्रमशाळा सुरडी ता. जि.बीड येथे दि. 21 जानेवारी 2016 पर्यंत सादर करावे.परिक्षा केंद्राचे नाव व वेळ खालीलप्रमाणे आहे.
औरंगाबाद जिल्हा श.आ.शा.बˆाम्हणी ता. कन्नड, नागद, वडनेर, तिसगाव, हट्टी, शिवूर, बनोटी, जळगाव सपकाळ, पाडळी, जळकीबाजार, चौका, औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, सिल्लोड, फुलबˆी, खुलताबाद, सोयगाव, गंगापूर, पैठण, जालना, भोकरदन, अंबड, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व इतर मान्यताप्राप्त शाळांमधील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी परिक्षेची वेळ सकाळी 11.00 ते 13.00 वाजेपर्यंत. मा. आष्टी जि. बीड सुरुडी,शेडाळा,थेटेगव्हाण अनु. आ.शा. शिरुर आनंतपाळ,लातूर,बीड जिल्हयातील सर्व जिल्हा परिषद व इतर मान्यताप्राप्त शाळांमधील इयत्ता 5 वीत शिकणारे अनुसचित जमातीचे विद्यार्थ्यांचा समावेश असल्यचे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.