माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या आयोजन संदर्भात 13 रोजी बैठक
औरंगाबाद, 9 - नागसेनवन औरंगाबाद येथील मिलींद आणि ईतर सर्व महाविद्यालयामधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन-2016 घेण्याच्या संदर्भात नुकतेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय नगसेनवन, औरंगाबाद येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
प.पु.बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 साली पिपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबईद्वारे औरंगाबाद येथील नागसेवनात मिलींद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर अनेक महाविद्यालये या नागसेवन वनात स्थापन झालेली आहेत. या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन आजपर्यंत हजारो विद्यार्थी राष्ट्र उत्कृर्षाच्या मुख्य प्रवाहात सामील झाली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची प्रेरणा घेऊन या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, समाजोन्नतीसाठी कसोशीने सतत प्रयत्नशील आहेत. डॉ.बाबासाहेबांनी स्वतःच्या देखरेखीखाली स्थापन केलेल्या महाविद्यालयांमधून गेल्या 65 वर्षाच्या अवधीतून ई.स.1950 ते ई.स.2010 या 60 वर्षांच्या दरम्यान जे-जे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेवून या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मार्चएप्रिल 2016 दरम्यान स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. या सर्व 60 वर्षाच्या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांना मिलींद महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र येऊन डॉ.बाबासाहेब साहेबांना नमता पूर्वक अभिवादन करून आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे. वरील बैठकीस औरंगाबाद, मुंबई येथील माजी विद्यार्थी गंगाधर गाडे, एन.बी.म्हस्के, एच.बी.तायडे, माधव बोर्डे, व्ही.जी.जाधव, विजयकुमार गवई, प्रतापसिंग बोदवडे, रूस्तुम अचालखांब, प्रताप कोचुरे, ए.जे.घाटगे, प्रा.डॉ.अरूणा लोखंडेताई, आत्माराम पाखरे, अर्जुन चव्हाण, सुरेश जाधव, अशोक कांबळे, प्रा.रमेश शिंदे, अॅड.आर.आर.खरात, अॅड.भरत अहिरे, डॉ.कमलाकर गंगावणे, प्रा.व्ही.पाईकराव, विजयकुमार गडलिंगे, डॉ.किशोर साळवे, व्ही.जी.तुरूकमाने, डी.वाय.मोरे, के.एस.म्हस्के, सी.मगरे, एस.एच.वाकोडे, डॉ.एन.के.सुतार, एन.पी.निकम, एन.टी.मोरे, पी.जे.निकम, एच.गडलिंगे, बी.आर.कंकाळ, बी.एंगडे, अॅड.यु.एस.खरात, अॅड.एस.व्ही.पंडीत, यु.एम.सुरवाडे, सी.एस.साळवे यांची उपास्िंथती होती.
या नियोजीत स्नेह संमेलनाच्या तयारीसाठी 13 जानेवारी 2016 बुधवार रोजी स.11 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सभागृह नागसेनवन, औरंगाबाद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या करिता माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की सदर नियोजीत बैठकीस उपास्िंथत राहून चर्चेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी निमंत्रक समिती--ए-ारळश्र - ाहरीज्ञश.परीरूरपऽूरहेे.लेा द्वारे संपर्क साधावा, असे निमंत्रक समितीचे एन.बी.म्हस्के यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.