Breaking News

ऑटोरिक्षा परवाना धारकांनी 7 दिवसाच्या आत अर्ज सादर करावेत


जालना,9 - उप प्रादेशिक परिवहन प्राधिकरण,जालना यांनी जिल्हयातील प्रवासी वाहतुकीसाठी ऑटोरिक्षा परवाने जारी केले असून मुदतबाहय ऑटोरिक्षा परवान्याच्या नुतणीकरणासाठी अर्ज दाखल करण्यासाठी परवान धारकास दि. 31 आक्टोबंर ते 15 डिसेंबर 2015 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापी ,परवाना मुदत वाढीसाठी पुरेशी संधी देवुनही,परवाना नुतणीकरणसा ज्या परवानाधारकांनी मुदतवाढ अर्ज दाखल केले नाहीत,त्या परवाना धारकांचे मूळ परवाने व्यपगत झालेले असून त्याबाबत मुदतवाढ देऊनही संबधितांनी परवाने नुतणीकरणासाठी अर्ज दाखल केले नाहीत. 
31 आक्टोबंर 2014 पूर्वी मुदत संपलेल्या व मुदतवाढीसाठी अर्ज न दाखल झालेल्या परवानाधारकांचे ऑटोरिक्ष परवाने रद्द का करु नयेत. त्यासाठी त्त्यांचे म्हणने मांडण्यासाठी सदर नोटीस प्रसिध्दी दिनाकांपासून 7 दिवसाची मुदत देण्यात येत आहे. रद्द करण्यात आलेल्या पस्तावित परवानाधारकांची नांवनिहाय व परवाना क्रमांक निहाय यादी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना नागेवाडी,औरंगाबाद रोड,जालना यांच्या कायालयातील नोटीस बोर्डवर डकविण्यात आली आहे. सात दिवसाच्या कालावधीत संबधित परवानाधारकाने त्यांच्या म्हणने लेखी स्वारुपात दोन प्रतीत उप प्रादेशिक कार्यालयात दाखल करुन त्याची पोच घ्यावी परवानाधारकांने आपले म्हणने सादर करतांना रिक्षा परवाना धारकाने त्याचे पूर्ण नांव,वाहन क्रमांक व परवाना क्रमांक अर्जात स्पष्ट नमूद करावा, अन्याथा अर्जावर विचार होणार नाही. ज्या मुदतबाहय परवान्यांच्या बाबतीत परवानाधारकाकडून या कारणे दाखवा नोटीसाच्या अनुषंगाने म्हणने मांडणारा अर्ज मुदतीत दाखल होणार नाही. त्यांच्या बाबतीत गुणवत्तेवर एकतर्फी निर्णय घेतला जाईल व तो व्यपगत झालेल्या संबधित परवानाधारकावर पूर्ण: बंधनकारक राहील, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.