Breaking News

पद्म पुरस्कार देण्याइतपत अनुपम खेर याने असे काय योगदान दिलेे? - कादर खान

मुंबई, 30 - अभिनेता अनुपम खेर याने असे काय योगदान दिले आहे जेणेकरून त्याला पद्म पुरस्कार दिला गेला आहे, असा सवाल जुनेजानते व बुर्जूर्ग अभिनेते कादर खान यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय अनुपम खेरने दुसरे काहीही केले नाही. त्यामुळेच त्याला पद्म मिळाला. बरं झालं मला पद्म मिळाला नाही. पण मी कोणाची स्तुती करणार नाही असेही कादर खान यांनी म्हटले आहे.
कादर खान म्हणाले, बरं झाल मला पद्म पुरस्कार मिळाला नाही. मी माझ्या आयुष्यात स्वार्थासाठी कधीच कोणाचा लाळघोटेपणा केला नाही. यापुढे करणार नाही. पूर्वी पद्म पुरस्कारांना महत्त्व होते. खरं तर लोकांना पद्म दिल्याने त्याचे महत्त्व वाढते. मात्र, अलीकडे पद्म देऊन एखाद्याचे महत्त्व वाढवले जाते. अलीकडच्या काळात दिलेल्या पद्मपुरस्कारावरून हेच दिसते. अनेकांना केवळ सत्तेतील लोकांच्या मागेपुढे केल्याने पुरस्कार मिळाल्याचे दिसून येते. अशा पद्धतीने पुरस्कार देणार आणि मिळणार असतील तर असला पुरस्कार मला नको. लोक आता स्वार्थी झाल्याने ते इतरांचा आदर करणे विसरले आहेत. 
यावर्षी काहींनी माझ्या नावाची शिफारस केली. त्यांचे मी आभार मानतो. मात्र यावर्षी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्याइतका मी सक्षम नसेल असे सांगत पद्म पुरस्कार घोषणेवर बोट ठेवले. 79 वर्षीय कादर खान सध्या मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहेत. सार्वजनिक वावर त्यांचा आता थांबलेला आहे. कादर खान यांनी आपल्या अभिनयाने व विनोदी शैलीने प्रत्येक भारतीयाला निखळ आनंद दिला आहे. ’हो गया दिमाग का दही’ हा फौजिया आरशी यांच्या चित्रपटात शेवटचे ते दिसले आहेत.