Breaking News

धार्मिक ओळख सांगायलाही हल्ली भीती वाटते- अनुपम खेर

मुंबई, 30 -  
गेल्यावर्षी आमीर खानने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याला मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. अजूनही समाजमाध्यमांवर आमीर विरोधात टीका केली जात आहे. असे असतानाच बॉलीवूड अभिनेता
अनुपम खेर यांनी भारतातील सद्य परिस्थितीबाबत भीती व्यक्त केली आहे. आयबीएन लाइव्ह या वृत्तवाहिनीला मुलाखत देतेवेळी खेर यांनी आपली धार्मिक ओळख सांगण्याबाबत भीती व्यक्त केली. काही बॉलीवूड सेलिब्रेटींना देशात असलेल्या परिस्थितीबाबत भीती वाटते. त्यावर खेर म्हणाले की, आमच्या क्षेत्रामध्ये सर्वांनाच भीती वाटते आणि यात माझाही समावेश आहे. मी हिंदू आहे असे सांगण्यास मला भीती 
वाटते. जर मी डोक्यावर टीळा लावला आणि भगव्या रंगाचे कपडे घातले तर बहुतेक लोकांना मी आरएसएस किंवा भाजपच्या विचारसरणीचा आहे असे वाटेल. काही दिवसांपूर्वीच अनुपम यांनी 2010 साली देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांवर ट्विटरद्वारे निषेध दर्शविला होता.