Breaking News

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे सूर्यमित्र कौशल्य विकास कार्यक्रम

 नाशिक/प्रतिनिधी। 30 - महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत 90 दिवसाचे निवासी व मोफत सुर्यमित्र कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन नाशिक येथे करण्यात येत आहे. 
या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षण बंद असलेल्या आणि  वय किमान 18 वर्ष पुर्ण असणे आवश्यक आहे.  तसेच शिक्षण 10 वी उत्तीर्ण व इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्टॉनिक्स, फिटर व शिटमेटलमध्ये आयटीआय किँवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. 
सदर कार्यक्रमात ग्रामीण भागातील अनुभवी सुशिक्षीत बेरोजगार महिला व पुरुषांना व अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्रवेश देता येणार नाही. कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण व निवास व्यवस्थेवर होणारा संपुर्ण खर्च महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नाशिकद्वारे करण्यात येणार असून सर्व प्रशिक्षणार्थीना गणवेश, जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, जोडे व टुल किट सुध्दा देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर प्लेसमेंटची व्यवस्था करण्यात येणार आहे. 
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात बेसिक इलेक्ट्रीकल्स, रिनुवेबल व सोलर एनर्जीचा परिचय, फोटो वोलटीक, टेक्नॉलजी व त्याच्या अपलीकेशनचे परिचय, पी व्ही सिस्टीमचे कँपोनटस ज्या मध्ये बॅटरी इनव्हर्टर व चार्ज कँटोलर, पी व्ही सिस्टीम साईझिंगचे फंडामेटल्स, पी. व्ही मॉडुल्सचे टबल शुटिंग, बॅटरी इनव्हर्टर व कँटोलरचे टबल शुटिंग, टूल्सचे महत्व व त्याचे उपयोग चेक लिस्ट प्रीप्रेशन, प्री रिक्वायरमेंट ऑफ इनश्टॉलेशन स्टक्चर, इरेकशन व सिव्हील वर्क, सोलर पॉवर प्लॉन्टचे इनस्टॉलेसन, केबल टे व केबल लेईन, कमिशनिंग व टेस्टींग ऑपरेशन, मेन्टन्स या सोबतच सॉफ्ट स्किल, उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण इ. विविध विषयांवर प्रात्याक्षिक थेअरी व भेटी द्वारे विशेष तज्ञ, व शासकीय पदाधिकारी मार्गदर्शन करतील. 90 टक्के उपस्थिती असल्यास प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल. 
ज्या महिला पुरुषांना या कार्यक्रमानंतर जॉब करावयचे असतील अशांनीच या कार्यक्रमाकरीता आपले अर्ज तातडीने  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गाळा नं. 11, उद्योग भवन, आयटीआय सिग्नल जवळ, सातपुर, नाशिक येथे पाठवावेत. 
कार्यक्रमास शाळा सोडल्याचा दाखला, मार्क सिट, आधारकार्ड, रेशनकार्ड, 4 लायसन्स साईज फोटो जातीचे प्रमाणपत्र इ. कागदपत्रासोबत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी आलोक मिश्रा मो.नं. 9403078763 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,सातपुर नाशिक यांनी कळविले आहे.