Breaking News

बलात्कारप्रकरणी एकास सक्तमजुरी

सांगली ः दि. 30 - विठ्ठलवाडी (ता. पलूस) येथे खाऊचे आमिष दाखवून दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश जगन्नाथ सदामते (वय 22) याला 11 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर यांनी सुनावली.
आरोपी सदामते हा गावातील मुलींची छेडछाड करीत होता. दोन-तीन घटनांमध्ये तो पकडला गेल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला पकडून बेदम चोपही दिला होता तसेच समजही दिली होती.  जानेवारी 2013 रोजी त्याने परिसरात खेळणार्‍या एका दहा वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून बोलवले. ग्रामपंचायतीजवळील मंदिराच्या परिसरात तिच्यावर बलात्कार केला. तिने घटना कोणाला सांगू नये म्हणून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. बलात्कारामुळे घाबरलेली मुलगी घरी गेल्यानंतर कोणाशी बोलत नव्हती. आईने तिला विश्‍वासात घेऊन विचारल्यानंतर तिने हकीकत सांगितली. त्यामुळे आई-वडिलांना जबर धक्का बसला. गावच्या सरपंचांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी सदामतेला बोलवणे पाठवले. परंतु तो आला नाही. शाळेत मिटिंग घेऊनही त्याला पाचारण केले. तरीही तो आला नाही. अखेर मुलीच्या आईने पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर व  भाऊसाहेब गोंदकर यांनी गुन्ह्याचा तपास केला. सदामते याला अटक झाल्यापासून तो कारागृहातच आहे. सरकारतर्फे अरविंद देशमुख यांनी खटल्यात जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. सदामते याने यापूर्वी गावात असे गुन्हे केल्याचे तसेच त्याला त्यासाठी चोपही मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. पीडित मुलगी, तिची आई, डॉ. शिवाजी गोसावी, तपास अधिकारी श्री. काटकर व गोंदकर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानुसार सदामते याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6 नुसार 7500 वर्षे सक्तमजुरी व  रुपये दंड सुनावला.