Breaking News

कादरिया बी.एड.कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

 बुलडाणा(प्रतिनिधी) ।30 - स्थानिक कादरिया बी.एड.कॉलेज, बुलडाणा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ.रहीम अ.कदीर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव मो.अशफाक अ.रहीम व मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ.जे.बी.देव्हडे उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य एस.डी.चौधरी व प्राचार्य डॉ.एस.एम.कानडजे यांची होती.
सकाळी 7.30 वा. अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ.जे.बी. देव्हडे यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.उन्मेष पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.ए.एस.घेवंदे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.वर्षा शिंदे, प्रा.स्वाती खंडारे, प्रा.शशिकांत जाधव, प्रा. चंद्रशेखर भांदककर, मुस्तफाशहा, सै.शहादत, प्रशांत राजपुत व अफजल बेग, सौ.काशिदकर व छात्र अध्यापक अध्यापिका आदी उपस्थित होते.