Breaking News

आपच्यावतीने तोंडाला काळ्या पट्टया बांधून मूक आंदोलन


औरंगाबाद, 23 - हैद्राबाद विद्यापी’ाचा विद्यार्थी रोहित वेमुला याने केलेल्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या केंद्रीयमंत्री बंडारु दत्तात्र्ये व केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करुन त्यांचेकडून राजीनामे घ्यावेत असे निवेदन आम आदमी पार्टी, औंरगाबाद, महाराष्ट्र यांचेकडून मा. पंतप्रधान, भारत सरकार, दिल्ली यांना मा. जिल्हाधिकारी साहेब, औरंगाबाद यांच्या मार्फत देण्यात आले व आज दि. 21 जानेवारी रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, औंरगाबाद समोर सदरील घटनेबाबत शांततेच्या व लोकशाहीच्या मार्गाने निषेध व्यक्त करुन तोंडाला काळ्या पट्टया बांधून मुक आंदोलन करण्यात आले.
येथून पुढे अशा घटना घडु नये याबाबत सरकारने खबरदारी घ्यावी, आम आदमी पक्ष औरंगाबाद येथून पुढे अशा घटना घडल्यास वेळोवेळी कायदेशील व शांततेच्या , लोकशाहीच्या मार्गाने सतत विरोध करेल. माजी मराङ्गवाडा मिडया संयोजक सुगˆीव मुंडे ,सतिश सचियंती,गौरव भारगच,कृष्णा जाधव,प्रकाश जाधव मो. बशिर भाई, विनोद रामकृष्ण झारे, वाहेद भाई, अ‍ॅड. लक्ष्मण पाटील प्रधान, झिशान नेहरी, अलियार भाई खान, सलीम पासवान, नासीर खतीब, जलाल्लोद्दीन खान, इरशाद मा. खान, सय्यद हबीब, सय्यद जुबेर, मो.अशीर अशोक चंद्रभान कुंडारे, सुभाष सुरजसिंग परदेशी, विष्णु झारगड, माजेद ख्चाान, अ. समद खान, समीर अन्सारी सहित अदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.