Breaking News

आलियाचे ट्विटरवर 70 लाख फॉलोअर्स

 मुंबई : अभिनेत्री आलिया भट हिने ट्विटर वर 70 लाख फॉलोअर्सचा विक्रम केला आहे. यावर 22 वर्षीय आलियाने तीच्या चाहत्यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांना प्रेमाचे आलिंगन दिले आहे. मी उत्तम प्रकारचे काम करीन ज्यामुळे तुम्हाला माझा अभिमान वाटेल, असे तिने म्हटले आहे.आलिया हिने 2010 साली ट्विटर सोशल मिडीया वर खाते सुरु केले होते. ती आता ‘उडता पंजाब’ आणि ‘कपुर ऑड सन्स’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.