Breaking News

नांदगावमध्ये उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ


 नाशिक /प्रतिनिधी। 11 - शामोष्णवी बहुउद्देशिय संस्था, नांदगाव येथे मंगळवार दि. 12 ते मंगळवार दि. 19 जानेवारी अखेर 52 व्या श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. यामध्ये साधु-संतांच्या बरोबर मान्यवर अध्यात्मावर मार्गदर्शन करतील अशी माहिती समितीचे अध्यक्ष संजय बबनराव सानप यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
त्यांनी सांगितले की, 12 तारखेला सुरू होणार्‍या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अमृत महाराज जोशी, दि. 13 रोजी संजय महाराज पाचपोर, दि. 14 रोजी रामराव महाराज ढोक, दि. 15 रोजी बाळू महाराज गिरगावकर, दि. 16 रोजी बाबासाहेब महाराज इंगळे, दि. 17 रोजी सोपान महाराज सानप यांचे तर दि. 18 रोजी गणेश महाराज बडे यांचे रात्री 8 वाजता काल्याचे किर्तन होईल. याशिवाय दररोज दुपारी 2 वाजता भागवताचार्य सोपान महाराज सानप भागवत कथा सांगतील. सप्ताहाचे उद्घाटन आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते दि. 12 रोजी स. 9 वाजता होईल. यावेळी वैराग्यमूर्ती हभप तुकाराम बाबा जेऊरकर, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, पोलीस निरीक्षक बी.बी.ढोंबे, अनिलदादा आहेर, संजय पवार, दिलीपदादा पाटील, नांदगावचे नगराध्यक्ष शैला गायकवाड, बाजारसमितीचे सभापती तेज कवडे, व्ही.एन. नाईक एज्युकेशन संस्थेचे संचालक रमेश बोडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड. शिवसेना तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, आरपीआय नेते देविदास मोरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दि. 18 रोजी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. रथ,घोडे आणि उंटाच्या सहभागाने निघणार्‍या या ग्रंथदिंडीमध्ये फरशीवाले बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीसह मराठी अभिनेते अशोक शिंदे, हिंदू महासभेचे राज्य अध्यक्ष गोविंद गांधी, मच्छिंद्र चाटे आदि मान्यवर मंडळी उपस्थित राहतील. दि. 19 रोजी न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार छगन भुजबळ, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, आमदार प्रणिती शिंदे, जयप्रकाश छाजेड, अशोक मुर्तडक, परळीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस टी.पी.मुंडे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री श्रीधर फडके यांचा फिटे अधाराचे जाळे या बावगीत आणि भक्तिगीताच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होऊल. सुयोग कॉलनी, साकोरा रोड नांदगाव येथे होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री संत भगवान बाबा सप्ताह समितीच्यावतीने केले आहे.
या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन संजय सानप यांनी केले आहे.