Breaking News

मोबाईल आणि कॉम्प्युटरसाठी डिजिटल इंडिया झाला अधिक सुरक्षित


 नाशिक/प्रतिनिधी। 4 - सध्या देशभरात सुरू असलेली ‘डिजीटल इंडिया’ ही चळवळ शहरी आणि ग्रामीण भागात तंत्रज्ञानामध्येे मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणताना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. केपीएमजीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या 2015 सालातील सायबर गुन्हे अहवालात भारतातील नामवंत 250 उच्च कंपन्यांपैकी 72 टक्के कंपन्यांना या याबर गुन्ह्यांचा त्रास जाणवत सल्याचे नमूद केले आहे. परंतु अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी अमेरिकेतील सातेरी सिस्टीमने मोबाईल आणि कॉम्प्युटर ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ‘सिक्युअर प्रो’ हे नवे अ‍ॅप बाजारात आमले आहे. ‘स्न्यिुअर प्रो’ या नव्या अ‍ॅपचा शुभारंभ नेहरू सेंटरच्या कल्चरल हॉल येथे करण्यात आले. 
या कार्यक्रमाला अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि भारत या देशांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन, अमेरिकेतील इरी-टेक-आयएनसी या कंपनी सीईओ डॉ. दाहयुन कीम, कॉम्पयुटर क्राईमच्या रिसर्च अ‍ॅण्ड प्रिव्हेशन विभागाचे महासंचालक डॉ. राकेश गोयल, निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप सोसायटीचे सीईओ सचिन पैठणकर स्मार्ट सिटी योजनेच्या थिंकटँक विभागाचे सदस्य विनोद मथाई, बायोमैट्रीक सिंगापूरचे एव्हीपी वसंत ताजणे, माजी पोलीस सहाय्यक आयुक्त आणि सातेरी सिस्टीमचे अध्यक्ष ललित महाडेश्‍वर आदि उपस्थित होते. या नव्या उत्पादनाबाबत बोलतांना सातेरी सिस्टीमचे अध्यक्ष ललित महाडेश्‍वर म्हणाले की, केपीएमजीच्या अहवालानुसार 64  टक्के संचालक किंवा मॅनेजर आपल्या कंपनीतील सायबर गुन्हे रोखण्यासाठी खासगीरित्या कर्मचारी नेमतात. त्यांच्या वेतनापेक्षा 
आपले ‘स्न्यिुअर प्रो’ अ‍ॅप कितीतरी किफायतशीर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेतील ‘डिजीटल इंडिया’ ‘सिक्युअर प्रो’ मुळे सेफ डिजिटल इंडिया’ल असा मला विश्‍वास आहे.