Breaking News

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

परभणी, दि.04 - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
       यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले व आदरांजली वाहिली. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा आग्रह धरला, महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली व परिश्रम घेत सर्वसामान्यांना शिक्षणाच्या  संधी उपलब्ध करून दिल्या असे मान्यवरांनी मनोगतात सांगितले.