Breaking News

भाजप आमदाराकडून बारची तोडफोड


नागपूर, 4 - भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रविवारी कार्यकर्त्यांसोबत एका रिसॉर्टची तोडफोड केली.  मल्लिकार्जुन रेड्डी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अयोध्येत राम मंदिर उभारले जावे, यासाठी बजरंग दलाच्या वतीने एक बाईक रॅली काढण्यात आली होती. रॅलीनंतर बजरंग दल आणि भाजपचे कार्यकर्ते रामटेक गड मंदिराजवळ पोहोचले आणि राजकमल रिसॉर्ट आणि बिअर बारची त्यांनी तोडफोड सुरु केली. मंदिर परिसराजवळ हे बिअर बार नको, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रिसॉर्टमधील कुंड्या, खुर्च्या, दारु आणि बाटल्यांसह मांसाहारी पदार्थही बाहेर फेकण्यात आले. विशेष म्हणजे तोडफोड झालेले राजकमल बार राज्य सरकारच्या चढऊउ (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ) च्या मालकीच्या असलेल्या जागेवर भाडेतत्वावर खाजगी व्यक्तीला चालवायला दिले आहे. त्यामुळे एका बाजूला महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या वतीने भाडे तत्वावर जागा दिली जाते आणि त्याच
ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार तोडफोड करतात असे काहीसे विरोधाभासी चित्र आज रामटेक मध्ये पहायला मिळाले.