Breaking News

मुंबईत हायअलर्ट,संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ



मुंबई, 4 - पठाणकोटमधल्या अतिरेकी हल्ल्यानं देशातल्या महत्त्वाच्या शहरांना अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईतल्या संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी कमालीचा बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईतल्या गजबजलेल्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहेत.
मुंबईत गेटवेचा परिसर, वेस्टर्न एक्प्रसेस हायवे, मरीन ड्राईव्ह अशा महत्वाच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला साधारण 55 तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही याठिकाणची चकमक थांबलेली नाही. कारण, 4 दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर आणखी 2 दहशतवादी याठिकाणी दबा धरुन असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे सरकारनं ऑपरेशन संपल्याची घोषणा करण्याच्या नादात घाई केली. काल गृहमंत्रालयानं तातडीची पत्रकार परिषद घेत अजूनही ऑपरेशन सुरु असल्याची माहिती दिली.